Rinku Rajguruसैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर (video viral) करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ (instagram video) शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ (instagram video) शेअर केला आहे. ज्यात तिने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसतो आहे आणि या व्हिडीओत ती साउथ इंडियन चित्रपटातील गाण्यावर चालताना दिसते आहे. या व्हिडीओतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.


-----------------------------------

Must Read

1) पवार, उद्धव, राज, फडणवीस शनिवारी एकाच मंचावर

2) इंटरनेट केबलची चोरी करणार्‍यास अटक

3) वादग्रस्त ठरलेल्या भुयारी गटर कामाची नव्याने निविदा

-----------------------------------

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर (amazon prime) अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.


या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.