Rhea Chakraborty
bollywood gossip- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत (sushant singh rajput) याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच सिनेमात दिसू शकते. ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर रिया जवळपास महिनाभर तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे आणि रियाला रिलॉन्च करण्यासाठी जबरदस्त वातावरण निर्मिती केली जातेय. 

रियाला (Rhea Chakraborty) अटक झाली तेव्हा बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी तिच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरले होते. आता पुन्हा एकदा बॉलिवूड सेलिब्रिटी रियाबद्दल बोलत आहेत. तूर्तास आलिया भट्टची आई सोनी राजदानने रियाला पाठींबा देत,ती निर्दोष असल्याचा पुनरूच्चार केला आहे.

सोशल मीडियावर (social media) एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना सोनीने रियाची पाठराखण केली. एका युजरने अर्नब गोस्वामीच्या चॅट लीक प्रकरणी एक ट्वीट केले. ‘रिया तर तुरुंगात गेली, तिचे करिअरही उद्ध्वस्त झाले. आता अर्नबचे काय होते, ते बघूच,’ असे या युजरने लिहिले. या युजरच्या ट्वीटवर कमेंट करताना सोनी राजदानने रियाची बाजू उचलून धरली.

-------------------------------------


Must Read

1) कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच

2) इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा

3) तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन आणि....

-------------------------------------

रिया  (Rhea Chakraborty) तुरुंगात गेल्याने तेच लोक एक्पोज झालेत, ज्यांनी तिला तुरुंगात पाठवले. रिया अगदी निर्दोष होती आणि तिला या प्रकरणात नाहक गोवले गेले. तिच्यासोबत आम्ही काम का करणार नाही? माझ्या मते, ती चांगले काम करेन. मी तरी हीच आशा करते,’ असे सोनी राजदानने लिहिले. (bollywood gossip)
रियाने अद्याप कोणताही नवा सिनेमा साईन केलेला नाही. मात्र सुशांतच्या मृत्यूआधी तिने साईन केलेला ‘चेहरे’ हा सिनेमा येत्या काळात रिलीज होतोय. यात अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी लीड रोलमध्ये आहेत. रूमी जाफरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती.

सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. पण अलीकडे घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर दिसली होती. तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. आजही मीडियाचे (social media) कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी रिया राहते घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे.