prepaid plans jio


Jio Phone युजर्ससाठी कंपनीने १५३ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केला आहे. या प्लान अंतर्गत युजर्संना २८ दिवसांची वैधता आणि रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा मिळत होता. १५३ रुपयांच्या या प्रीपेड प्लानला (prepaid plans) आता कंपनीने जुलै २०१७ मध्ये लाँच केले होते. 

तसेच फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्लानला अपडेट केले होते. यासोबत ४९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान कंपनीने आणला होता. जिओ फोन युजर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस फ्री मिळत होते. जिओकडून नुकतीच फ्री कॉलिंग सुरू करण्यात आल्यानंतर काही दिवसांच्या आत हा प्लान बंद करण्यात आला आहे.

------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी: कोरोना लसीकरणाला स्थगिती

2) भांडण सोडवणाऱ्या भावांना जमावाची मारहाण

3) टेंशन संपलं! आता वर्षातून एकदाच करा मोबाइल रिचार्ज

------------------------------------------

जिओ साइटवर १५३ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान हटवण्यात आला आहे. लेटेस्ट अपडेट नंतर जिओ फोन युजर्संसाठी आता चार रिचार्ज प्लान (prepaid plans)  शिल्लक राहिले आहेत. यात १८५ रुपयांचा रिचार्ज प्लान, १५५ रुपयांचा प्लान, १२५ रुपयांचा रिचार्ज प्लान आणि ७५ रुपयांचा रिचार्ज प्लान यांचा समावेश आहे.

जिओकडे १५५ रुपयांचा रिचार्ज प्लनमध्ये अनेक बेनिफिट मिळतात. दरम्यान, १५३ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा मिळत होता. परंतु, १५५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळत आहे.