reliance jio


रिलायन्स जिओनं (reliance jio) ग्राहकांना नववर्षाचं गिफ्ट दिलं होतं. १ जानेवारीपासून जिओच्या ग्राहकांना मोफत लोकल व्हॉइस कॉल्सची सुविधा देण्याचा निर्णय जिओनं घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओनं इतर नेटवर्कवर कॉल केल्यास पैसे आकारण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी अनेक प्लानदेखील (recharge plan) लॉन्च केले होते. दरम्यान, आता रिलायन्स जिओनं आपल्या ४ जी डेटा व्हाऊचर्ससोबत कॉलिंग बेनिफिट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ जानेवारीपासून सर्व नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मोफत दिल्यानंतर जिओनं टॉकटाइम प्लॅन्सवर कॉम्पिमेंट्री डेटा देणं बंद केलं होतं. याव्यतिरिक्त आता जिओनं ४ जी डेटा व्हाऊचर्सवर व्हॉईस कॉलिंग बेनिफिट्सही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिओनं आपल्या टॉकटाईम प्लॅन्सवर (recharge plan) १०० जीबी पर्यंत मोफत डेटा व्हाऊचर्स देण्यास सुरूवात केली होती. तर दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी १ हजार मिनिटं मिळत होती. परंतु आता ती मिळणं बंद झालं आहे.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

रिलायन्स जिओनं आपले ११ रूपये, २१ रूपये, ५१ रूपये आणि १०१ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्समध्ये बदल केले आहेत. जिओच्या ११ रूपयांच्या ४ जी डेटा व्हाऊचर्समध्ये अन्य नेटवर्कवरील कॉलिंगसाठी ७५ मिनिट मिळत होते. तर १०१ रूपयांच्या व्हाऊचरवर अन्य नेटवर्कवरील कॉलिंगसाठी १ हजार मिनिटं देण्यात येत होती. व्हॉईस कॉलिंग बेनिफिट्ससह जिओनं या व्हाऊचर्समध्ये मिळणारा डेटा दुप्पट केला होता.

टॉपअप प्लॅन्समध्ये डेटा बेनिफिट नाही

रिलायन्स जिओच्या १०, २०, ५०,१००, ५०० आणि १ हजार रुपयांच्या टॉकटाईम प्लॅनमध्ये १०० जीबीपर्यंत कॉम्प्लिमेंट्री डेटा देण्यास सुरूवात केली होती. परंतु आता ते केवळ टॉकटाइम प्लॅन्स झाले आहेत. जिओच्या १ हजार रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४४.४६ रूपयांचा टॉकटाइम देण्यात येतो.