telecom companyआपण जर मोबाईल प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्यांला रिचार्ज करत असाल आणि यातून आपल्याला सुटका हवी असेल तर रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (telecom company) आदी कंपन्याचे स्वस्त प्लॅन बाजारात उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये वर्षभराची वैधता दिली जाते. आज तुम्हाला अशा वर्षभरासाठी असलेल्या प्लॅनची माहिती देत आहोत. ज्याचा खर्च 125 रूपयांपेक्षाही कमी आहे. या प्लॅनसोबत (recharge plan) अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्सही मिळणार आहेत.

Airtel

एअरटेल कंपनीचा 365 दिवसांचा एक प्लॅन 1498 रुपयांचा आहे. या प्लॅनच रिचार्ज केले तर तुम्हाला महिन्यास 124.8 टक्के इतका खर्च येतो. जर तुम्ही यातील प्लॅन्सच्या बेनिफिट्सबद्दल म्हटले तर यावर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. तसेच यासोबत 24 जीबी डेटाही मिळतो. याव्यतिरिक्त ग्राहकाना 3600 एसएमएस देखील मिळतात. यासोबतच Airtel Xtreme प्रिमिअम आणि विंक म्युझिकचंदेखील सबक्रिप्शन दिले जाते.

-------------------------------------

Must Read

💪1) धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा

😱 2) पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 🏢 3) बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका

------------------------------------

व्होडाफोन-आयडिया

व्होडाफोन आयडियाचे देखील वर्षभराचे प्लॅन (telecom company) आहेत. यातील एका प्लॅनची किंमत 1499 रुपये इतकी आहे. या प्लॅनसोबत 365 दिवसाची वैधता मिळते. याचा प्लॅनचा एका महिन्याचा खर्च 124.91 रुपये इतका होतो. या प्लॅनसोबतच सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. याव्यरिक्त 3600 एसएमएस आणि 24 जीबी डेटाही देण्यात येतो. तसेच या प्लॅनबरोबर Vi Movies आणि TV चे सबस्क्रिप्शन देण्यात येते.

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओचा 1299 रुपयांचा प्लॅन (recharge plan)  जवळपास वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह येतो. यात 11 महिन्यांची वैधता मिळते. तसेच या प्लॅनचा महिन्याचा खर्च 118 रूपये इतका पडतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 24 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 3600 एसएमएस आणि जिओ ॲप्सचं सबस्क्रिप्शन मिळते.