redmi days sale smartphone price less


Xiaomi ने भारतात रेडमी डेज सेलचे आयोजन केले आहे. कंपनीची वेबसाइटवर ११ जानेवारी पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये रेडमी स्मार्टफोन्सवर डिल्स आणि डिस्काउंट (smartphone price)दिला जात आहे. या सेलमध्ये Redmi Note 9 Pro Max, Redmi Note 9 Pro, Redmi 8A Dual आणि Redmi Note 9 स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Redmi Note 9 Pro Max ला या सेलमध्ये १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तसेच ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट कार्ड्स आणि EasyEMIवर १२५० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळू शकतो. तसेच ग्राहकांना या फोनवर ३९९९ रुपयांचा Mi WiFi Smart Speaker ला केवळ १९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. या ठिकाणी नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन सुद्धा दिला आहे. हा फोन ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर सोबत येतो.

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

Redmi Note 9 Pro ला या सेलमध्ये १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या ठिकाणी नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन मिळत आहे. तसेच फोनसोबत ग्राहकांना ३९९९ रुपयांच्या Mi WiFi Smart Speaker ला १९९९ रुपयांत (smartphone price) खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी आणि 720G प्रोसेसर सोबत येतो.

Redmi 8A Dual ला कंपनीच्या वेबसाइटवर ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि १३ मेगापिक्सलचा ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप तसेच स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर दिला आहे. Freecharge द्वारे फर्स्ट ट्रांझॅक्शन केल्यास ग्राहकांना ७५ रुपयांपर्यंत १० टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

Redmi 9 Prime ला या सेल मध्ये ९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी, 13MP+8MP+5MP+2MP क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच मीडिया टेक हीलियो G80 प्रोसेसर दिला आहे. Redmi Note 9 ला या सेलमध्ये ११ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5020mAh ची बॅटरी दिली आहे.