alcohol deliverycrime news- इचलकरंजी येथील गांधी कॅम्पनजीक असलेल्या ओबी बीअर बारवर आज रात्री पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने छापा टाकला. ड्राय डे असताना बार सुरू (alcohol delivery) होता.

कारवाईत ६८ हजार ५८० रोकड, मद्यसाठा यासह तलवार, जांबिया व कटर अशी शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी बारमालकासह आठ जणांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी बार मालक ओंकार अरूण बडवे (वेताळ पेठ) यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले. व्यवस्थापक उद्धव शिवाजी निकम (सरस्वती मार्केट), संदीप संजय पाटील (महासत्ता चौक), राहूल राजाराम कांबळे (खंजीरे अपार्टमेंट), शहारुख जब्बार समडोळे (मंगळवार पेठ), हणमंत रामचंद्र वाळवेकर (कलानगर), संपत गंगाधर शिंगाडे, अमित तानाजी लगारे (दोघेही राहणार वेताळ पेठ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. (crime news)

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

येथील गांधी कॅम्पनजीक ओबी बार आहे. महात्मा गांधी पुण्यदिन असल्यामुळे शासनाकडून ड्राय डे जाहीर केला होता. त्यामुळे मद्यविक्रीस मनाई (alcohol delivery)होती. मात्र ओबी बार सुरू असल्याची माहिती महामुनी यांना मिळाली. त्यानुसार पथकांने बारवर रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला.

कारवाईमुळे खळबळ उडाली. कांही वेळातच गावभाग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मद्यसाठा जप्त करतांना तेथे एक तलवार, जांबिया व कटर सापडले. ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. याशिवाय ६८ हजार ५८० रोकड, तीन मोबाईल, डीव्हीआरसह बीअर व मद्यसाठा असा सुमारे एक लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला.