rbi bank


भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता आणखी एका बँकेचा (bank) परवाना रद्द केला आहे. इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवम बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. आरबीआयने याआधीच शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. 

शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात (police) गुन्हा दाखल झालेला आहे. आता बँकेचा थेट परवाना रद्द झाल्याने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. याआधी आरबीआयने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने हा मोठा निर्णय जाहीर केला.

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------

"शिवम सहकारी बँकेकडे (bank) पुरेसे भांडवल नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात येत आहे. २९ जानेवारी २०२१ पासून बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत", असं आरबीआयनं म्हटलं आहे. 

खातेधारकांना दिला दिलासा

शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द झालेला असला तरी खातेधारकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. पैसे जमा करणाऱ्या ९९ टक्क्यांहून अधिक खातेधारकांची रक्कम इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँकेत पैसे जमा असलेल्या खातेधारकांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.