रश्मिका मंदानाentertainment news- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर रश्मिकाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, रश्मिकाने तिच्या मानधनात वाढ केली असून बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन घेतल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रश्मिकाचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर रश्मिकाने विकास बहल यांचा डेडली हा आगामी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी रश्मिकाला मिळणार आहे. मात्र, या चित्रपटासाठी रश्मिकाने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

----------------------------------------

Must Read

1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?

2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष

--------------------------------------

सध्या तरी विकास बहल यांच्या ‘डेडली’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. रश्मिका पूर्वी हा चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफला ऑफर करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव कतरिनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे आता रश्मिकाला बिग बींसोबत झळकण्याची संधी मिळणार आहे.(entertainment news)

दरम्यान, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रश्मिकाचं मानधन वाढल्यामुळे सध्या कलाविश्वात ही एकच चर्चा रंगली आहे. ‘डेडली’ या चित्रपटात रश्मिका व बिग बींसोबत नीना गुप्तादेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंटअंतर्गत होणार आहे.