rape case


अंगावर शहारे आणणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी, अशीच संतापजनक आणि क्रूर घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अंगणवाडी सेविका असलेल्या महिलेवर बलात्कार (rape case) करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हादरवून सोडणारी बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या असून, या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेच पीडितेचा मृत्यू झाला असून, एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात असलेल्या उघैतीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. ५० वर्षीय महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करायची. महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहिती प्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजी : गावभागात नव्याने तीन रुग्ण आढळले

2) कोरोचीत गव्याचा वावर: शेतकऱ्यांच्यात घबराटीचे वातावरण

3) तुमचे धान्य घेऊन जा!, इचलकरंजीत अशीही विनंती

----------------------------------

याबाबत पोलिसांनी पुजाऱ्याची चौकशी केली. “पीडित महिला विहिरीत पडली होती. ती रडत होती. ती रडत रडतच मदतीसाठी बोलावत होती. इतर दोन व्यक्तींसह आपण विहिरीकडे गेलो. महिलेच्या नातेवाईकांचा आपल्याकडे मोबाईल नंबर नव्हता. त्यामुळे महिलेचा मृतदेह तिच्या घरी देऊन आलो,” असं पुजाऱ्यानं म्हटलं आहे.

पोलिसांनी पीडित महिलेचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं. शवविच्छेदन अहवालातून महिलेवर बलात्कार करण्यात आला असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचबरोबर महिलेचा एक पाय मोडलेला असून, गुप्तांगातही गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.

पीडितेच्या कुटुंबीयांनी पुजाऱ्याने बलात्कार (rape case) करून खून केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला, असं पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सोमवारी सकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत.