rape casecrime news- शाळेतून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (rape case) करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी फरहान ढालाईत (वय 25, रा. नदाफ गल्ली, मिरज) याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

मुलगी गुरुवारी शाळेतून घरी परतत होती. त्यावेळी फरहान याने तिला दुचाकीवरून गांधी चौक ते बसस्थानक रस्त्यावरील मित्राच्या खोलीत नेले. तेथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (rape case)  केला. त्यानंतर तिला परत नेत असताना तिच्या नातेवाईकांनी पाहिले. त्यामुळे फरहान याने दुचाकी टाकून तेथून पळ काढला.

फरहान याला अटक करून त्याच्यावर बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------