job application at railway


देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. या काळात त्याचबरोबर त्यांनतर अनेक कर्मचार्यांच्या नोकऱ्यांवर (government job) गदा आली आहे. त्यामुळे त्यांना नोकरी टिकवणे महात्वाचे आहे.त्यामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक भरती (job application) प्रक्रिया देखील लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आता हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या दरम्यान राज्य तसेच केंद्र सरकारकडून विविध प्रशासकीय पदांसाठी भारती प्रक्रिया परापाडली जात आहे. 

अनलॉक दरम्यान अनेक प्रकारच्या शासकीय (government job) पदाभार्तीच्या जाहिराती शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर या परीक्षांमध्ये यश संपादन करत शासकीय नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाल्या आहेत

लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले असताना आता सरकारी क्षेत्रातून एका आशादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेकडून अप्रँटिसच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या सुमारे १००४ पदांसाठी ही भरती निघाली असून, दहावी पास उमेदवार या पदांसाठी (job application)  अर्ज करू शकतात.

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीमध्ये किमान ५०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, त्याशिवाय संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा डिप्लोमा असणे आवश्य आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण १००४ पदांची भरती होणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील अप्रँटिसच्या पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. यामध्ये हुबळी २८७, कॅरिएज रिपेअर वर्कशॉप हुबळी २१७, बंगळुरू डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन १७७, सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर ४३ अशी पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी २४ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी यांच्याशाठी १०० रुपये एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तर आरक्षित वर्ग आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही निवडण शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल.