raid-gambling-dens-ichalkaranji-jaysingpur

(Ichalkaranji Crime) येथील आरगे भवननजीक काळ्या ओढ्यालगत उसाच्या शेतात व जयसिंगपुरातील शाहूनगरमध्ये घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर (Gambling densपोलिसांनी छापा टाकला. दोन्ही कारवाईत रोकडसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करून 22 जणांवर गुन्हा दाखल केला. गावभाग, जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

इचलकरंजीत गावभाग पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई करून मोटारसायकल, मोबाईल, जुगार साहित्य व रोकडसह 45 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवलिंग शिवाप्पा पाटील (कृष्णानगर), अर्जुन गोपाळ कांबळे (आसरानगर), रेहमान निजाम अन्सारी (कृष्णानगर), गणेश बाबूराव आवळेकर (विक्रमनगर), अतुल पवार (कृष्णानगर), सलीम निपाणीकर, महंमद कोतवाल, सादीक जमादार, राजू कांबळे, राकेश शेंडूरे, किरण कांबळे, मलिक अस्लम, सुरज सातपूते (विक्रमनगर, आरगे मळा) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. 

रविवारी सायंकाळी आरगे भवनपासून थोड्या अंतरावर असलेल्या काळ्या ओढ्याच्या बाजूला उसाच्या शेतात तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसाना मिळाली. पोलिसांनी छापा टाकताच चौघे जण सापडले. उर्वरितांनी पलायन केले. यामध्ये 15 जणांना अटक केली. (Ichalkaranji Crime) कारवाईत 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.   

70 हजारांचा मुद्देमाल जप्त 
जयसिंगपूर ः शाहूनगरमध्ये मारुती आनंदा पवार यांच्या घरी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी केली. याबाबतची फिर्याद रोहित डावाळे यांनी दिली आहे. मारुती आनंदा पवार (महालक्ष्मी चौक जयसिंगपूर), किरण नारायण पवार, अमर हणमंता पवार, सूरज शिवाजी भोसले, संतोष अशोक अलकुटे (समडोळे मळा शाहूनगर), संतोष शहाजी भोसले, आकाश ऊर्फ दादया मारुती पवार यांना जुगार खेळताना पकडून गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.