Punjab National Bank


जर आपलेही खाते पंजाब नॅशनल बँकेत आहे, तर आपल्यासाठी ही बातमी खूप उपयुक्त आहे. उद्या 1 फेब्रुवारीपासून पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या एटीएममधून पैसे (bank) काढण्याच्या नियमात बदल करणार आहे. देशभरातील वाढत्या एटीएम (ATM) फसवणूकी रोखण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. पीएनबी बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

पीएनबी बँकेने ट्विट केले की 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना ईएमव्ही (EMV) नसलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत. बँकेने म्हटले आहे की आमच्या ग्राहकांना एटीएमच्या फसव्या प्रकरणांपासून वाचवण्यासाठी ते ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनवरील व्यवहारांवर 01.02.2021 पासून बंदी आणणार आहेत. डिजिटल व्हा, सुरक्षित रहा!

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

नॉन ईएमव्ही एटीएम म्हणजे काय?

नॉन ईएमव्ही एटीएम किंवा ईएमव्ही नसलेले एटीएम असे असतात ज्यात व्यवहार करताना एटीएम किंवा डेबिट कार्डचा वापर केला जात नाही. या मशीनमध्ये डेटा कार्ड एका चुंबकीय पट्टीद्वारे वाचले जाते. येथे काही सेकंदांसाठी कार्ड लॉक देखील होते.

सध्याची ओटीपी (OTP) आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा

डिसेंबर 2020 मध्ये बँकेने (bank) एटीएममधून रोकड काढण्यासाठीचे नियम बदलले होते. ज्यामध्ये ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत, खातेदारांना 10,000 रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठविला जातो. ओटीपीशिवाय रक्कम काढणे शक्य नसते.

ओटीपी आधारित सिस्टममधून अशी काढा रक्कम

जर तुम्ही 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम काढत असाल तर बँक तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवते. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर बँक तुम्हाला पैसे काढण्याची परवानगी देते.