pubg-to-be-launch-from-19-january

(PUBG) मोबाईल इंडिया गेम भारतात कधी येतो याची लाखो गेमर्स आतुरतेनी वाट पाहत आहेत. हा गेम इतका लोकप्रिय झाला की विचारता सोय नाही. भारत-चीन सीमेवरील तणावानंतर गेल्यावर्षी भारत सरकारने देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने चिनी App वर बंदी घातली होती. त्यात PUBG मोबाईल (Mobile) गेमवर बंदी घालण्यात आली.  त्या आधी हा गेम तरुणांमध्ये इतका लोकप्रिय होता की अनेक मुलांनी तो खेळता खेळता त्यातलं टारगेट पूर्ण करण्यासाठी जीवही दिला होता.

इंडिया कॉम ने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने सुचवलेल्या सुधारणा करून PUBG  मोबाईल गेम पुन्हा भारतात येणार असल्याची अफवा उठली होती. कारण या बातमीला भारत सरकार किंवा हा गेम तयार करणारी पेरेंट कंपनी क्राफ्टऑननी अजूनपर्यंत एकदाही दुजोरा दिलेला नाही. अशीच एक बातमी सोशल मीडियामध्ये पेरली गेली आणि एका युट्युब चॅनलवरून त्याचा एक टिझरही रिलीज झाला की येत्या 19 जानेवारीला म्हणजे आज 19 जानेवारी 2021 ला PUBG  मोबाईल गेम भारतात पुन्हा सुरू होणार आहे. 

आता काय सोशल मीडियावर गेमच्या चाहत्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि सगळीकडे (PUBG) असा गैरसमज झाला की खरंच आज हा गेम पुन्हा सुरू होतोय. पण आम्ही आपल्याला याबाबतचं सत्य सांगतोय की हा मोबाईल गेम भारतात 19 जानेवारीला सुरू होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा विश्वासार्ह सूत्रांनी केलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार PUBG Mobile India हा गेम भारतात आज लाँच होणार नाही.

हा गेम जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तसंच 15 ते 19 जानेवारीदरम्यान कधीही लाँच होईल अशाही काही बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यातही काहीही तथ्य नाही. या आधी अधिकृत एवढीच माहिती उपलब्ध आहे की भारत सरकारने सांगितल्याप्रमाणे गेममध्ये बदल करून तो पुन्हा सुरू करण्याची तयारी क्राफ्टऑननी केली होती.

दरम्यान, PUBG  कॉर्पोरेशननी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जाहीर केलं होतं की क्राफ्टऑन कंपनीने अनीश अरिवंद यांना नवे कंट्री मॅनेजर म्हणून नेमलं होतं. तसंच इतर चार जणांनाही कंपनीने नोकरी दिली होती. त्यामुळे चाहत्यांच्या आशा-आकांक्षा खूप वाढल्या. पण सध्या तरी हा गेम परत येणार असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. दुसरीकडे FAUG हा गेम येत्या 26 जानेवारी 2021 ला भारतात लाँच होणार आहे.