Petrol Diesel rate


आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (international Market) कच्च्या तेलाचे (Crude Oil) भाव उतरले असले, तरी देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात तीन दिवसानंतर वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) गेल्या तीन दिवस दरात कोणतीही वाढ केली नव्हती, त्यामुळे गेले तीन दिवस पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर होते. पण आज सोमवारी पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel rate today) वाढ झाली आहे.

सोमवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84.95 रुपये इतका झाला. तर डिझेलचा दर प्रति लिटर 75.13 झाला आहे. आज दोन्ही इंधनांचे दर 25 पैशांनी वधारले आहेत.

1 जानेवारीपासून आतापर्यंत पेट्रोलच्या भावात प्रति लिटर 1.24 रुपये वाढ झाली असून, डिझेलचा दर 1.26 रुपयांनी वाढला आहे. नवीन वर्षात आतापर्यंत पाच वेळा पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.

-------------------------------------

Must Read

1) कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच

2) इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा

3) तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन आणि....

-------------------------------------


काय आहेत तुमच्या शहरात दर -

दिल्लीत आज 18 जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलचा दर वधारला आहे. पेट्रोलचा दर रविवारी 84.70 रुपये होता, तो आज 84.95 रुपये प्रति लिटर झाला आहे. म्हणजेच लिटरमागे 25 पैसे वाढ झाली आहे. डिझेलचा दर रविवारी 74.88 रुपये होता, तो आज 75.13 रुपये प्रती लिटर झाला आहे. म्हणजेच डिझेलही लिटरमागे 25 पैशांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोलचा (Petrol Diesel rate today)  दर 24 पैशांनी वाढून 91.56 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा भाव लिटरमागे 27 पैशांनी वाढून 81.87 रुपये प्रति लिटर झाला आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा भाव लिटरला 24 पैशांनी वाढून 86.39 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा भाव 25 पैशांनी वाढून 78.72 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोलचा दर 23 पैशांनी वधारून प्रती लिटर 87.36 रुपये झाला आहे, तर डिझेलच्या दरात 24 पैसे प्रती लिटर वाढ होऊन तो 80.43 रुपये प्रती लिटर झाला आहे.

बेंगळूरूमध्ये पेट्रोलचा दर 26 पैशांनी वधारून प्रति लिटर 87.82 रुपये आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 27 पैसे वाढ होऊन तो 79.67 रुपये प्रति लिटर झाला आहे.