(police) पोलिसांना नेहमीच सज्जनांचं रक्षण करत दुर्जनांना शिक्षा देणारे म्हटलं जातं. सोबतच त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची जोपासना करणारे म्हणूनही समाजात आदर मिळतो. पण आता मात्र पोलिसांचंच गुंडागर्दी करणारं धक्कादायक रूप समोर आलं आहे.

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) हा प्रकार घडला आहे. रोहतांग पासजवळ नुकत्याच उद्घाटन झालेल्या अटल टनेलमध्ये (Atal Tunnel) पोलिसांनी केलेल्या गुंडागर्दीचा व्हीडिओ एका ट्विटर युजरने (twitter user) शेअर केलाय. हा व्हीडिओ (video) बराच व्हायरल (viral) झाला आहे.

या व्हीडिओमध्ये (video) पोलीसवाले (Himachal Police) एका पर्यटकाला अंगठे धरायला किंवा कोंबडा बनायला भाग पाडत आहेत. शिवाय या पोलिसांनी त्याला खूप मारून (police)अर्धमेलंही केलं आहे. हातापायांनी लाथाबुक्क्या घातल्या सोबतच काठीनंही मारहाण केली. या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे.

हा टुरिस्ट पूर्ण वेळ रडत गयावया करत होता. मात्र पोलिसांनी त्याचं म्हणणं ऐकलं नाही. या पोलिसांपैकी एक जण बॉर्डर रोड्स ऑर्गनायजेशनशी संबंधित असल्याचं कळतं आहे. हा व्हीडिओ कुणीतरी मागे गाडी उभे करत लपून शूट केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा टुरिस्ट शनिवारी खूप गर्दी असतानाही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला दम दिला. सूत्रांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले गेले आहेत.

याआधीही 24 डिसेंबरला कुलू इथं पोलिसांनी 7 पर्यटकांना पकडलं होतं. हे सगळे पर्यटक अटल टनेलमध्ये गाडी थांबवून नाच-गाणं करत होते. त्यातून खूप काळ वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत गाड्याही जप्त केल्या होत्या.