देशातील कोरोनाग्रस्तांची (Coronavirus) संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,04,13,417 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,139 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 234 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,50,570 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येत्या आठवड्यापासून देशातील लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मोदी सोमवारी कोरोना लसीबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन यांनी लसीविरूद्ध पसरलेल्या चुकीच्या माहितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि यामुळे लसीकरणाच्या तयारीला धक्का बसू शकेल, असे सांगितले. आठवड्यापासून देशातील लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, लसीकरण कार्यक्रम कोरोना लसीच्या मंजुरीनंतर 10 दिवसानंतर सुरू होऊ शकेल. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात डीसीजीआयने 3 जानेवारीला मान्यता दिली. यानुसार, देशात कोरोना लसीकरण कार्यक्रम 13 किंवा 14 जानेवारीपासून सुरू होऊ शकेल.

------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------


ड्राय रनमध्ये काय होणार?

कोरोना लसीसाठी घेण्यात येणाऱ्या या ड्राय रनमध्ये कोविड 19 रोलआऊटच्या सर्व पैलू उदाहरणार्थ राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि रुग्णालय स्तरांवरील अधिकाऱ्यांची ओळख पटवून दिली जाईल. कोविड 19चे लसीकरण सुरु करण्यासाठी वॉक-इन-फ्रीजर, वॉक-इन-कूलर, आइस-लाइंड रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजरसोबतच सिरिंज आणि इतर संसाधनांच्या पुरेशा साठ्याबाबचीही निश्चिती करण्यात येईल.

कोरोनाबाबतची सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. देशातील एक कोटींहून अधिक लोकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई जिंकली आहे. कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात भारी असून देशाचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट 96.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 44 पटींनी जास्त आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून एकूण 51 टक्के बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्र सरकारने खरेदी केलेल्या कोरोना लसीचे सुमारे 10 टक्के डोस हे कचऱ्यात फेकावे लागतील. यामुळे सरकारला जवळपास 1320 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवरून हे समोर आलं आहे. हे नुकसान प्रत्यक्षात लसींच्या 'प्रोग्रेमेटिक वेस्टेज' स्वरूपात असणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून केंद्र सरकार ज्या लसी विकत घेणार आहे त्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पापासून ते आरोग्य केंद्रापर्यंतच्या वाहतुकीदरम्यान लसीच्या 100 पैकी 10 डोस खराब होतील आणि ते फेकावे लागतील. यामुळे केंद्र सरकारला 50 व्यक्तींच्या लसीकरणासाठी किमान 110 डोसची ऑर्डर करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस दिले जातील.