donald and pm modiराष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड  ट्रम्प  यांच्यासारख्या  बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो  रुपये  खर्च  करून पंतप्रधान नरेंद्र  मोदी (pm narendra modi)  यांनी अहमदाबाद  येथे ट्रम्प (donald trump) यांच्या निवडणूक प्रचारासाठी जणू एक मोठी रॅली आयोजित केली होती. निवडणुकीत उमेदवार  असलेल्या  दुसऱ्या  राष्ट्राच्या  अध्यक्षासाठी  एखाद्या  देशात  अशी  रॅली  सहसा  आयोजित  करणे  परराष्ट्र  धोरणाला  अनुसरुन  होत  नसते.  अशा  ट्रम्प  यांच्यासोबतच्या नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या दोस्तीचे  दुष्परिणाम  भविष्यात भारताला  भोगावे  लागणार  आहेत, अशी  टीका  काँग्रेस  प्रवक्ते  माजी  आमदार  अनंत  गाडगीळ यांनी  केली  आहे.

------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

इंग्लडमध्ये  नवा कोरोनाचा  प्रकार  पसरू  लागला  असतानासुद्धा  इंग्लडच्याच  पंतप्रधानांना  प्रजासत्ताक  दिनाला  प्रमुख  पाहुणे म्हणून  बोलविण्यात  आले  होते. आता तर तो दौराही रद्द करण्यात आल्यामुळे  भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे. याशिवाय  भारताभोवतालच्या  नेपाळ,  श्रीलंका  व  भूतान  या  देशामधील राजकीय घटना व चीनचा  या  देशांवरील  वाढत  चाललेला  प्रभाव  या  साऱ्यामुळे मोदींच्या  परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता  उघड  झाली  आहे, असेही गाडगीळ म्हणाले.

अमेरिकेत नक्की काय घडलं?

जगात प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या अमेरिकी लोकशाहीवर बुधवारी अध्यक्ष समर्थकांनीच हल्ला केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. या वेळी हिंसाचारात चार जण ठार झाले. अमेरिकी संसदेने बायडेन-कमला हॅरिस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अखेर ट्रम्प यांनी पराभव मान्य केला. यामुळे नव्या अध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला.