petrol-and-diesel-price-hike-on-wednesday-06th-january-2021

(petrol definition) सलग 29 दिवस इंधनाचे दर स्थीर राहिल्यानंतर आज त्यामध्ये बदल पाहायला मिळाला आहे. तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल-डिझेलचे भाव जारी केले जातात. मात्र गेल्या 29 दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल पाहायला मिळाला नव्हता. मात्र नवीन वर्षात आज पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल पहायला मिळाला. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार आज डिझेलच्या किंमतीत 25 ते 27 पैसे प्रति लीटर आणि पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत 24 ते 26 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहेत नवीन किंमती...

महानगरातील पेट्रोलचे भाव

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, बुधवारी दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलचे दर (Petrol Price in Delhi) 83.97  तर मुंबईमध्ये 90.60 रुपये प्रति लीटर आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलच्या किंमती 85.44 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये हा दर प्रति लीटर 86.75 रुपये आहे.

----------------------------------

Must Read

1) इचलकरंजी : गावभागात नव्याने तीन रुग्ण आढळले

2) कोरोचीत गव्याचा वावर: शेतकऱ्यांच्यात घबराटीचे वातावरण

3) तुमचे धान्य घेऊन जा!, इचलकरंजीत अशीही विनंती

----------------------------------

महानगरातील डिझेलचे भाव

त्याचबरोबर डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीनंतर, बुधवारी दिल्लीमध्ये एक लीटर डिझेलचे दर (Diesel Price in Delhi) 74.12 रुपये तर मुंबईमध्ये दर 80.78 रुपये प्रति लीटर आहे. (petrol definitionकोलकातामध्ये डिझेलच्या किंमती 77.70 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये हा दर प्रति लीटर 79.46 रुपये आहे.

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

कसे तपासाल नवे दर?

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही जर इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.