local newslocal news- कोरोना काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत या महिन्यात ताप, थंडी, पुरळ तसेच निर्जलीकरणाच्या रुग्णसंख्येत घट (kolhapur) झाली आहे. गतवर्षी याच महिन्यात (डिसेंबर) ताप, पुरळ, खोकला, सर्दी आदी आजारांची रुग्णसंख्या 8 हजार 521 इतकी होती. तर यावर्षीच्या नोव्हंबर महिन्यात ही रुग्णसंख्या 6 हजार 445 इतकी आहे.

कोरोनामुळे नागरिकांनी केलेला मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, गर्दी टाळणे तसेच तात्काळ औषधोपचार यामुळे ही रुग्णसंख्या घटल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

----------------------------------------

Must Read

1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?

2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष

--------------------------------------

गतवर्षी म्हणजेच 4 नोव्हेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीन जिल्ह्यातील  (kolhapur) 12 तालुक्‍यात तापाचे 8हजार 521 रुग्ण होते. तसेच पुरळ व तापाचे 19 रुग्ण होते. त्याचबरोबर ताप व रक्‍तस्त्रावाच्या 3 रुग्णांचा समावेश होता. सर्दीचे रुग्ण 1334, निर्जलीकरणाची रुग्णसंख्या 4062 इतकी होती. मात्र या तुलनेत 4 नोव्हेंबर 20 ते 30 नोव्हेंबर 20 या काळात सर्वच आजारांचे रुग्ण कमी झाले आहेत. (local news)

कोरोनामुळे लोकांनी आरोग्याची चांगली खबरदारी घेतली आहे. मास्कचा वापर होत आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाल्यानंतरही लोकांचे आजारी होण्याचे प्रमाण कमी झाल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.