Rhea Chakraborty


सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सुशांतच्या मृत्यूला रियाच कारणीभूत आहे असा आरोप सुशांतच्या घरच्यांनी केला आहे. त्यानंतर खरे आरोप -प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. मात्र, यासर्व प्रकरणावेळी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (photo share on social media) रियाच्या विरोधात रान पेटवले होते.  यासर्व प्रकारामुळे रिया मात्र, सोशल मीडियापासून दूर गेली आहे. सोशल मीडियावर रिया कुठलीही प्रतिक्रिया देत नाही किंवा मत ठेवत नाही. (Party with friends)

या दरम्यान रियाने (Rhea Chakraborty) कोणत्याही पार्टी अथवा कार्यक्रमांना हजेरी लावणे देखील बंद केले होते. मात्र, आता रिया पार्टी करताना दिसली नुकताच रियाने राजीव लक्ष्मणसोबत पार्टी केली आहे. राजीव लक्ष्मणने मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत रिया देखील एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र, आता रियाची ही पार्टी सुशांतच्या चाहत्यांना पचनी पडणार नाही. कारण सुशांतचे निधन होऊ एक वर्षही झाले नसताना रिया पार्टी करत आहे.

--------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------नुकताच राजीव लक्ष्मणने पार्टीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर (photo share on social media) केला आहे. त्यामध्ये रिया राजीवला मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना राजीवने लिहले आहे की, ‘माय गर्ल’ रिया लवकरच चित्रपटाद्वारे कमबॅक करणार आहे. रुमी जाफरीने एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. “हे वर्ष रियासाठी अत्यंत धक्कादायक ठरलं. हे वर्ष तर सर्वांसाठीच वाईट होतं.

मात्र, तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. एक मिडल क्लास कुटुंबाची मुलगी एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यामुळे ती खूप खचली आहे. रुमी जाफरीने रियाला आश्वासन दिलंय की संपूर्ण इंडस्ट्री मोठ्या मनाने तिचं स्वागत करेल. त्यांनी सांगितलं की, “ते नुकतेच रियाला भेटले होते. ती यावेळी अत्यंत शांत होती. ती काहीही बोलली नाही. ज्या दुखातून ती गेली आहे, त्यानंतर तिच्यावर कुठलाही आरोप करणे चुकीचं आहे.