इचलकरंजी येथील पालिकेसमोर वाहनांच्या पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगबाबत (parking system) कोणतेच नियोजन नाही. जागा मिळेल तिथे वाहनांचे पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या वाहनांनाही आता जागा मिळणे मुश्कील झाले आहे.
पालिकेत विविध कामांच्या निमित्ताने रोज अनेक नागरिक येतात. याशिवाय राजकीय कार्यकर्त्यांची तर रोज मोठी वर्दळ आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रवेशद्वारात सकाळच्या सत्रात वाहने पार्किंगचा जटिल प्रश्न निर्माण होत आहे. वाहन पार्किंगबाबत कोणतेच नियोजन नाही. प्रवेशद्वारात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. त्याचे कोणीही ऐकत नाही. विशेष करून राजकीय कार्यकर्त्यांची वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जातात.
-------------------------------------------
Must Read
2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित
3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती
---------------------------------------------
पदाधिकाऱ्यांची वाहने बाहेर
पूर्वी पालिकेच्या प्रवेशद्वारात पदाधिकाऱ्यांची वाहने पार्किंग (parking system) केली जात होती. मात्र, दुचाकींच्या बेशिस्त पार्किंगमुळे पदाधिकाऱ्यांची चारचाकी वाहने पालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत येत नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या बाहेरच आपली वाहने पार्किंग करावी लागतात. अनेकदा वाहने काढतानाही बेशिस्त पार्किंगचा फटका सहन करावा लागतो.
पालिका इमारतीच्या पिछाडीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कर्मचारी आपली वाहने पूर्वी पार्किंग करीत होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात आत्मदहन प्रकरणानंतर पार्किंग शेडमधील बहुतांश जागा रिकामीच पडलेली असते. सध्या पार्किंग शेडमध्ये येणारे दोन्ही दरवाजे आत्मदहन घटनेनंतर बंद ठेवण्यात आले आहेत.
आंदोलनावेळी अडथळा
पालिकेवर अनेकदा मोर्चे, आंदोलने होतात. मात्र, पालिकेत येणाऱ्या मार्गावरच वाहनांचे पार्किंग असते. वास्तविक, पालिकेत येणारा मार्ग खुला ठेवण्याची गरज आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आंदोलनाच्या वेळी वाहनांच्या पार्किंगचा मोठा अडथळा होत असतो.
शिस्त लावण्याची गरज
शहरात सध्या सर्वच ठिकाणी वाहने पार्किंगचा (parking system) गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक इमारतींत पार्किंगची व्यवस्थाच नाही. आता पालिकेसमोरच वाहन पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेने याबाबत ठोस नियोजन करण्याची गरज आहे.