(Crime) क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून युवतीचा विनयभंग (Debauchery) केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. युवराज जमदाडे असे त्याचे नांव आहे. या प्रकरणी पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शाहू कॉर्नर परिसरातील एका जीममध्ये पिडीत युवती जाते. त्याचठिकाणी क्षुल्लक कारणावरुन तिचे संशयित युवराज जमदाडे याच्याशी वाद झाला. त्यातूनच जमदाडे याने फिर्यादीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. (Crime) तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जमदाडे याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सपोनि प्रज्ञा चव्हाण करीत आहेत.