rohit sharmacricket news- सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आपेक्षेप्रमाणे रोहित शर्माचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मयांक अगरवालला आराम देण्यात आला असून त्याच्याजागी रोहित शर्माची संघात एण्ट्री झाली आहे. भरातीय संघात एकूण दोन बदल करण्यात आले आहे. रोहित शर्माव्यतिरिक्त (cricketer) नवदीप सैनीचीही निवड करण्यात येणार आहे.

सिडनी कसोटी सामन्यात नवदीप सैनी कसोटी पदार्पण करणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत तो वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार याबाबत आधीच निश्चित झालं होतं. मात्र, तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार यावर चर्चा होती. मयांकला आराम देत अजिंक्य रहाणेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीविराची भूमिका पार पाडतील.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजी : गावभागात नव्याने तीन रुग्ण आढळले

2) कोरोचीत गव्याचा वावर: शेतकऱ्यांच्यात घबराटीचे वातावरण

3) तुमचे धान्य घेऊन जा!, इचलकरंजीत अशीही विनंती

----------------------------------

आपेक्षेप्रमाणे हनुमा विहारीला आणखी एक संधी देण्यात आली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विहारी छाप पाडण्यात अपयशी ठरला होता. तरीही कर्णधार आणि प्रशिक्षकानं त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. दोन बदल वगळता भारतीय संघ दुसऱ्या कसोटीचाच आहे. (cricket news)

असा आहे भारतीय संघ –

अजिंक्य राहणे (कर्णधार) (cricketer), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी (पदार्पण)