nora fatehiनोरा फतेही नेहमीच आपल्या जबरदस्त डान्स मुव्ह्सनी सर्वांना थक्क करत असते. सतत तिचे वेगवेगळे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि ती तिच्या फॅन्स घायाळ करत जाते. नोरा एक नवा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) झाला आहे. ज्यात ती कोरिओग्राफर रजितदेव सोबत 'बॉडी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नोराने हा व्हिडीओ तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर अकाउंटवर (instagram post) शेअर केलाय. यातील तिच्या डान्सचं फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.

नोरा फतेही या व्हिडीओत शॉर्ट्स, स्लीवलेस टॉप आणि कॅप घालून कूल अंदाजात डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका गाजत आहे की, आतापर्यंत याला ३८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, नोरा नुकतीच करिना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' शोमध्ये आली होती. यावेळी नोराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------बॉलिवूडमधील सुरूवातीच्या दिवसातील एक किस्सा तिने सांगितला की, एका कास्टिंग डिरेक्टरने तिला घरी बोलवून फार रागावलं होतं. त्याच्या वागण्याने नोरा इतकी दु:खी झाली होती की, तिने भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता.नोराच्या करिअरबाबत सांगायचं तर काही दिवसांपूर्वीच तिचं 'नाच मेरी राणी' हे गाणं रिलीज झालं होतं. हे गाणं सुपरहिट ठरलं. पंजाबी गायक गुरू रंधावासोबतच्या या गाण्याला आतापर्यंत २० कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा आता लवकरच 'भुज' सिनेमात अजय देवगनसोबत दिसणार आहे. या सिनेमाशी संबंधित नोराची एक क्लीपही व्हायरल (instagram post) झाली होती. ज्यातील नोराचं काम तिच्या फॅन्सना चांगलंच आवडलं होतं.