upi payment

केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार (upi payment) करण्याची सुविधा सुरू केलीये. पण, नव्या वर्षापासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्यावर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शुक्रवारी निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिलं आहे.

1 जानेवारी 2021 पासून UPI द्वारे केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, असं NPCI ने स्पष्ट केलं आहे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, असं आवाहनही NPCI कडून नागरिकांना करण्यात आलंय. त्यामुळे नव्या वर्षातही UPI वापरकर्त्यांना विनामूल्य सेवा वापरता येणार आहे.

---------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

खासगी बँकांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (upi payment) व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी समाज माध्यमांवर पसरली होती. नव्या वर्षापासून एका महिन्यात UPI द्वारे 20 पेक्षा अधिक व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर 2.5 रुपये आणि 5 रुपये शुल्क द्यावे लागणार असल्याचं, या व्हायरल वृत्तात म्हटलं होतं. पण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं NPCI ने स्पष्ट केलं आहे.