curfew


कोरोना विषाणूचा संसर्ग (coronavirus) आता सर्वच राज्यांमध्ये कमी होत आहे. पण प्रत्येक राज्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने (state government) नेमून दिलेल्या नियमांचं पालऩ करणं बंधनकारक आहे. पण अद्यापही काही राज्यामध्ये कोरोना पर्श्वभूमीवर कडक नियम करण्यात आले आहेत. गुजरात सरकारने शनिवारी चार प्रमुख शहरांमध्ये नाईट कर्फ्यू (curfew) जारी केला आहे. सुरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट याठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे.

नोव्हेंबर महिन्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत सरकारने (state government) या चार शहरांमध्ये नाईट कर्फ्यू जारी केला होता. तेव्हा लागू करण्यात आलेला कर्फ्यू (curfew) 15 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. याआधी 31 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. आता 15 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे, मात्र यावळी नाईट कर्फ्यूचे तास कमी करण्यात आले आहेत. 

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) पंकज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शिवाय कोरोना विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचा दर आता 96.64 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता देशात देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णांच्या रिकव्हरीचा दर देखील दिलासादायक असला तरी नियमांचं पालन महत्त्वाचं आहे.