navab malik


ड्रग्ज पुरवठा प्रकरणात (drugs case) मुंबईतील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (Narcotics Control Bureau) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स धाडलं आहे. समीर खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

एनसीबीच्या (Narcotics Control Bureau) पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी व समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?,' याची माहिती एनसीबीकडून घेतली जाणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात (drugs case) नाव आलेल्या 'मुच्छड पानवाला'चा मालक रामकुमार तिवारी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.