NCP


गेल्या काही दिवसांपासून राज्यात शहरांच्या नामांतरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद समोर येत आहेत. औरंगाबादचं नाव संभाजीनगर केल्यावरून काँग्रेसने शिवसेनेला सुनावलं होतं, त्यानंतर आता पुन्हा CMO ने ट्विट  (twitter post) करून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या नावावरून महाविकास आघाडीत कुरघोडी होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही याबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे. (politics news)

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील याबाबत म्हणाले की, औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेची भूमिका ठरलेली आहे, आणि ती पूर्वीपासून आहे. शिवसेना दोन्ही शहरांचा उल्लेख संभाजीनगर व धाराशीव असा करते, ते आम्हालाही माहीत आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. मात्र या नामांतराबाबत काँग्रेसचीही एक भूमिका आहे. तिन्ही पक्षांच्या भूमिका आपापल्या ठिकाणी आहेत. 

------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी: कोरोना लसीकरणाला स्थगिती

2) भांडण सोडवणाऱ्या भावांना जमावाची मारहाण

3) टेंशन संपलं! आता वर्षातून एकदाच करा मोबाइल रिचार्ज

------------------------------------------

कुणी कुठल्या नावाचा आग्रह धरावा हा त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांची मतं मांडू शकतात. पण सरकारशी त्याचा संबंध नाही, असं सांगत ''सरकार किमान समान कार्यक्रमावर बनलेलं आहे'', याची आठवणही जयंत पाटील यांनी यावेळी करुन दिली आहे. 

तत्पूर्वी, राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वैद्यकीय खात्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत CMO नं ट्विट (twitter post) करून म्हटलंय की, धाराशिव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला सलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे, यात उस्मानाबादचा धाराशिव उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं.(politics news)

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धाराशिव म्हणा किंवा संभाजीनगर, जोपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय होत नाही तोवर त्याला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतरणाला विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार आणताना किमान समान कार्यक्रम आखण्यात आला, त्यामध्ये कुठेही नामांतरणाचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.