ajit pawar
politics news- काहीजण बिब्बा कालवायचं काम करतात. ते जित्राब लय वाईट, त्यांचा अजिबात विचार करू नका' असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichad Padalkar) यांच्यावर चांगलीच सडकून टीका (political criticism) केली.

बारामतीमध्ये (Baramati) आज अजित पवार यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गदिमा सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता सडकून टीका केली.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

'बारामतीकर पवार साहेबांना तसंच सुप्रिया सुळे यांना आणि मलाही पाठिंबा देता म्हणून आम्हाला अस वाटतं जेवढ्या लवकर होईल तेवढे काम करावं. सकाळी दिवस उजाडल्यानंतर आम्ही काम सुरू करतोय.  सूर्य उगवून दिसायला लागलं की, आम्ही कामाला सुरुवात करतो नाहीतर रात्रीची पण काम केली असती' अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. (politics news)

'जर काही चांगलं चाललं असताना आपल्याकडे म्हणताना काही जण बिब्बा कालवायचं काम करतात. ते जित्राब लय वाईट, त्यांचा अजिबात विचार करू नका, तसं ही तुम्ही बारामतीकर विचार करत नाही जर बाहेरच कुणी पार्सल आल तर त्याच डिपॉझिट जप्त करून परत पाठवतात' असं म्हणत अजित पवार यांनी विधानसभेला बारामतीतून विरोधात उभे राहिलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता टोला (political criticism) लगावला.

 'पवार साहेबांचे वय 80 झालेय मी 60 ला आलो आहे, सुप्रिया देखील पन्नांशीला आली आहे, जसजस आमचं वय वाढेल तसंतसं आमचा उत्साह वाढतंच चालला आहे, असं म्हणत ते पुढे मिश्किलपणे 'कामाचा बरं का' असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

बारामतीत गदिमा सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत  'माझा व्यवसाय माझा हक्क' या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्रमात  उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी शिरुरचे आमदार अशोक पवार जुन्नरचे आमदार अतुल बेनके  उपस्थित होते.