ncp-chief-sharad-pawar-on-ncp-leader-jayant-patil

(Politics) राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती. पण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad) यांनी 'उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर?' असा मिश्किल सवाल उपस्थितीत करून जयंत पाटलांच्या विधानातून हवा काढून टाकली.

महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये अनेक नेते हे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याचं मानलं जातं. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये याची संख्या मोठी आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत इच्छा बोलून दाखवली.

याबद्दल शरद पवार यांना विचारले असता 'काही झालंय का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थितीत केला. पत्रकारांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला असता 'आत उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावे वाटलं तर काय करू? मला कधी वाटत नाही म्हणून कुणी करत नाही' अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

सांगलीतील (Sangli) इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी त्यांची राजकारणातील इच्छा बोलून दाखवली आहे. इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. " दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. (Politics) मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे '' असं स्पष्ट विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं होतं.

"आमच्या पक्षाकडं सध्या ते पद नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. ती संख्या पुरेशी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल,'' असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. मंत्रिपदापेक्षा प्रदेशाध्यक्षपद भावतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

'केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही'

'केंद्र सरकार सुरक्षा देत असेल तर आम्ही त्यात काही करू शकत नाही. राज्याच्या सुरक्षेचा मुद्दा असेल तर त्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारला आहे. पण, केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आहे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा देण्याबद्दल वरीष्ठ अधिकारी थ्रेट पर्सेप्शनचा अभ्यास करून निर्णय घेत असतात. फडणवीस सरकारच्या काळात माझी सुद्धा सुरक्षा कमी करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही काहीही आक्षेप घेतला नव्हता. आता केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

'आता ज्यांना सुरक्षा हवी आहे, त्यांनी केंद्राकडे मागणी केली असेल निदान त्यांना आता झोप तरी चांगली येईल. काही लोकांना सुरक्षारक्षक बंदुकीसह घेऊन मिरवायला चांगले वाटत असेल, त्यामुळे त्यांच्यासाठी ते बरे आहे, अशी खिल्लीही शरद पवारांनी उडवली.