molest allegation on dhananjay munde


राष्ट्रवादी काँग्रेसचे (politics party) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार (molestation) केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे. पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले आहे.

मात्र त्यानंतर रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

"एखादी तक्रार आल्यानंतर पोलीस निश्चित रूपानं याची चौकशी करणार. ज्या महिला आरोप करत आहेत. त्यांच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालं आहे. त्यांची दोन मुलंही आहेत. त्यांचं नावही मुलांना दिलं आहे. आता त्यांची बहीण पुढे आली आहे. परंतु जे काही आरोप आहेत पोलीस निश्चितचपणे याचा तपास करतील. हा त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. घरातील काय विषय आहे यावर धनंजय मुंडेच बोलू शकतील. पण त्यांच्या बहीण या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत ही खरी गोष्ट आहे," असं मलिक म्हणाले. 

"जे काही सत्य असेल त्यावर पोलीस कारवाई करतील. त्यांच्या बहीण या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत हे तक्रारदार महिला सांगत नाहीत. कौटुंबिक विषय असताना जे काही आरोप (molestation) होतायत त्यावर पोलीस तपास करतील. चौकशीत जे काही सत्य आहे ते समोर येईल," असंही ते म्हणाले.