(crime)
 
कबनूर चौकातील डेक्कन रोडवर  संदिप मागाडे (वय 25 , रा. हराटीभाग, भिमराज भवन जवळ, कबनूर) या युवकावर अज्ञातांनी कोयता, चाकू व तलवार आदी शस्त्रांनी  हल्ला करून त्याचा खून (Blood) केल्याची  घटना शनिवारी रात्री  घडली. सदरचा खून  पुर्ववैमनस्यातून किंवा राजकीय वादातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.  

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की,  रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कबनूर दर्गाच्या पिछाडीस असलेल्या वस्तीमध्ये संदीप मागाडे याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.जीव वाचविण्यासाठी तो पळत मुजावरकीच्या रिकाम्या जागेतून आझादनगर येथे आला असता त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यावेळी घटनास्थळी रक्ताचे थारोळे व रक्ताने माखलेला दगड दिसत होता. (crime) सदर युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालय येथे दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

पूर्ववैमनस्यातून किंवा  राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.  दरम्यान, हल्ल्याची घटना घडल्यानंतर आयजीएम परिसरात नातेवाईक, मित्र मंडळी व  परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. सदर घटना समजताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अप्पर पोलिस उपअधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस अधिक्षक महामुनी यांनी भेट दिली व पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला.  संदीप मागाडे हा रॅपिअर मागावर कामास होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ व बहिण असा परिवार आहे.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलवार, दगड व दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत.