Sushant Singh Rajput

सहा महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. परंतु, या प्रकरणात काहीच हाती लागले नाही. या प्रकरणात नक्की काय घडलं याचं कोडं उलगडलेलं नाही. आधी मुंबई पोलीस (Mumbai Police) सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर जनभावना लक्षात घेता हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आलं. 

सीबीआयच्या (CBI) तपासातून अनेकविध पैलू समोर आले . पण अद्याप सुशांतच्या बाबतीत नक्की काय घडलं? याचं उत्तर सीबीआयने (CBI) दिलेलं नाही. याच दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुशांत प्रकरणातील सीबीआयच्या तपासाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

---------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

३० डिसेंबरला सुशांत मृत्यू प्रकरणाच्या (Sushant Singh Rajput)  तपासाबाबत सीबीआयकडून माहिती देण्यात आली होती. सीबीआय अधिक व्यापक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करत आहे. या प्रकरणातील वैज्ञानिक बाबीदेखील तपासल्या जात आहेत. तपासादरम्यान कोणताही विविध कंगोरे तपासले जात असून कोणतीही बाब दुर्लक्षित केली जात नाही. 

सर्वोच्च न्यायालयानेदेखील (supreme court) आम्ही केलेल्या तपासाला अति शय 'प्रोफेशनल' तपास असं म्हटलं होतं. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा जो निष्कर्ष काढेल तो आमच्या निष्कर्षासारखाच असेल. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. मला खात्री आहे की सीबीआयचे अधिकारी लवकरच या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. या प्रकरणाचा जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल तो निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल. ', असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.