ms dhoni and jivaक्रिकेटच्या दुनियेत महेंद्रसिंह धोनीपेक्षा (ms dhoni) जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेले फारसे खेळाडू नाहीत. धोनीने २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. पण तरीदेखील त्याचा जाहिरातविश्वातील दबदबा कमी झालेला नाही. त्यातच आता एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी (advertisement) धोनीसह त्याची लेक झिवा हिलाही अभिनयाची संधी मिळाली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच झिवाला आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत बाबा धोनी आणि लेक झिवा हे दोघेही दिसत आहेत.

झिवा अवघ्या पाच वर्षांची आहे. पण झिवाचा फार मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर झिवाचे एक अकाऊंट आहे. या सोशल मीडियावर साईटवर १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिच्या अकाऊंटवरून तिचे स्वत:चे आणि धोनी-साक्षीसोबतचे फोटो पोस्ट केले जातात. 

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------


या फोटो आणि व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असतात. नव्या वर्षात झिवा पुढचं पाऊल टाकत एका प्रसिद्ध उत्पादनाच्या जाहिरातीत (advertisement) झळकली आहे. ओरियो या चॉकलेट क्रिम बिस्कीटच्या जाहिरातीत धोनी आणि झिवा मस्ती करताना दिसत आहेत.

दरम्यान, ‘सेलेब्रिटीनेटवर्थ’च्या माहितीनुसार सध्या धोनीचे मूल्य १७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे. धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग नसला तरी IPLमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळताना तो एका हंगामाचे १५ कोटी रूपये कमावतो. गेल्या काही महिन्यांत धोनीने शेती करण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात येत आहे. धोनीची ही नवी इनिंग्स कशी असेल याकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.