movement-against-ichalkaranji-municipality-kolhapur

(seattle protest) येथील आसरानगर परिसरातील कचरा डेपोतील (Garbage Depotआगीच्या प्रश्‍नाचे आज पुन्हा पालिकेत पडसाद उमटले. कचरा डेपो हटाओ कृती समितीतर्फे पालिकेच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत कचरा डेपोतील आगीचा प्रश्‍न कायमचा मार्गी न लावल्यास तेथे कचरा टाकण्यास विरोध करण्याचा इशारा आंदोलकांना दिला. येत्या 15 दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिले. 

आसरानगरमधील डेपोमध्ये दररोज 120 टन कचरा टाकला जातो. तेथे कचऱ्याचे कोणतेही विलगीकरण केले जात नाही. प्लास्टिक कचऱ्याचेही प्रमाण मोठे आहे. पावसाळ्यात कचरा कुजतो. परिसरात दुर्गंधी पसरली जाते. तर इतर वेळा कचरा पेटून त्याचे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरतात. सुमारे दोन किलो मीटरचा परिसरात धुराने व्यापला जातो. हा त्रास सातत्याने परिसरातील रहिवासी नागरिकांना होत आहे. सन 2005 पासून या परिसरातील नागरिकांनी या प्रश्‍नांबाबत पालिकेला नेहमी जाब विचारला आहे,(seattle protest) पण कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज कचरा डेपो हटाओ कृती समितीतर्फे पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार आज समितीने पालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करीत पालिका प्रशासनाचा धिक्कार केला. या वेळी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा स्वामी यांना निवेदन देऊन चर्चा केली. याप्रश्‍नी टप्प्याटप्प्याने उग्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर डॉ. आरती कोळी, राजू कोरे, मुन्ना खलिफा, संकेत बागल, किरण माळी, शेखर पवार, सुधीर जोशी, सुरेखा लोहार, विशाल गोपलकर, डॉ. आनंद कोळी, जीवन कोळी, दिनेश लिमये यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

मागण्या अशा... 
- कचरा डेपोवरील आग विझविण्यासाठी 
18 जानेवारीपर्यंत आवश्‍यक उपाययोजना करावी 
- कामगारांची नियुक्ती करावी 
- कसूर करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी निश्‍चित करावी 
- कचरा डेपोबाबत श्‍वेतपत्रिका काढून ती जाहीर करावी