woman harassments
कोल्हापूर – इचलकरंजी बसमध्ये विवाहीतेची छेडछाड (harassment) प्रकरणी एकाची प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली आहे. यावेळी घडल्या प्रकाराने संबंधीत यूवतीने आरडा – ओरड केल्याने बसमधील त्या व्यक्तीची बसमध्ये चांगलीच धुलाई केली. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर पोलिसांनी येथील आयजीएम रुग्णालयात (hospital) उपचार करुन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

बाजीराव किल्लेदार ( मुळ रा तिटवे, सध्या रा. कात्यायणी अपार्टमेंट, कळंबा कारागृह रोड, कळंबा , कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. तो जिल्ह्यातील एका मोठ्या नामवंत सहकारी संस्थेमधून नुकताच सेवानिवृत्त झाला असून, त्याची जिल्ह्यातील अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींबरोबर ऊठ बस असते. हा प्रकार दुपारी घडला असून, त्याच्या विरोधी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

--------------------------------------


पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, कोल्हापूरहून इचलकरंजीला विना थांबा एसटीबस गुरुवारी दुपारी येत होती. यावेळी संशयीत बाजीराव किल्लेदार हा बसमध्ये बसलेल्या एका युवतीशेजारी जावून बसला. सदरची बस अतिग्रे फाटा पार करुन इचलकरंजीकडे येत होती. याचदरम्यान त्याने शेजारी बसलेल्या युवतीची छेडछेडा (harassmentकाढण्यास सुरुवात केली. तरी देखील पिडीतीने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्याने त्या यूवतीशी लगट करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पिडीतेने त्याला मारहाण करीत आरडा – ओरड सुरु केली.

हा प्रकार बसमधील अन्य प्रवाश्यांना समजताच त्यांनी त्याची बसमध्ये चांगली धूलाई केली. यामध्ये तो जखमी झाला. बस इचलकरंजी बस स्थानकात येताच त्याला प्रवाश्यानी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्या स्वाधिन केले. या घडल्या प्रकाराची माहीती शिवाजीनगर पोलिसांना समजताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. 

जखमी किल्लेदाराला ताब्यात घेवून उपचाराकरीता येथील आयजीएम रुग्णालयात (hospital) दाखल केले. उपचारानंतर त्याला शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.