mirzapur-fame-guddu-bhaiya-alias-ali-fazals-popularity

(web series) अभिनेता अली फजलने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याला जास्त लोकप्रियता मिर्झापूर (Mirzapurवेबसीरिजमधून मिळाली आहे.  मिर्झापूरमुळे अभिनेता अली फजलच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. या यशानंतर अभिनेता अली फजलच्या मानधनात वाढ झाली आहे.अली फजलची लोकप्रियता पाहून त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. त्याने मानधनात चांगली वाढ केल्याचे समजते आहे. मानधनातील ही वाढ साधीसुधी नसून त्याने ३० ते ४० टक्के मानधन वाढवल्याचे सांगण्यात येत आहे.

---------------------------------------

Must Read

1) खाणीमध्ये आढळून आलेल्या यूवकाचा खून

2) इचलकरंजीत सभापती निवड बिनविरोध

3) Marathi Joke : नवरा आणि बायको

---------------------------------------

अली फजलने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील (web seriesकाम केले आहे. त्यामुळेच आता त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.

अली फजलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा तो लोकप्रिय मिर्झापूर सीरीजच्या दुसरा सीझनमध्ये दिसला. यातील त्याच्या भूमिकेला फॅन्सचं भरभरून प्रेम मिळत आहे. आता तो हॉलिवूडच्या एका वॉर ड्रामा सिनेमात चक्क मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं नाव 'कोड नेम- जॉनी वॉकर' असं असेल. हा सिनेमा याच नावाच्या एका नावेवर बनला आहे जी इराक युद्धाची एक सत्यकथा आहे.

अली फजलच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर अली फजल आणि रिचा चड्डा गेल्यावर्षी लग्न करणार होते. पण कोरोनोमुळे त्यांना त्याचे लग्न पुढे ढकलावे लागले. ते दोघे आता कधी लग्न करणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ते दोघे कधी लग्न करणार याविषयी रिचानेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. रिचाने नवभारतटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, कोरोनाची परिस्थिती पाहाता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच आम्ही ठरवले की, आम्ही लग्न पुढे ढकलूया... सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकांना लग्नाला येणे शक्य नाहीये. आमचे अनेक फ्रेंड्स विदेशातून देखील लग्नाला येणार आहेत. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्याशिवाय सुरक्षित वाटणारच नाही. त्यामुळे लस आल्यावर, लस लोकांना मिळाल्यावर आम्ही लग्नाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत तरी आमचा लग्नाचा काहीही विचार नाहीये.