family man web series


अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज (web series) चर्चेत आहे. भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजच्या पहिल्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर प्रदर्शित (teaser release) झाला आहे.

‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजच्या एक मिनिट सहा सेकंदाच्या टीझरमध्ये श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या लाइफमध्ये समस्या असल्याचे पाहायला मिळते. तसेच सर्वजण तो गायब असल्याचे बोलताना दिसत आहेत. टीझरच्या (teaser release) शेवटी मनोज वाजपेयीची झलक पाहायला मिळते. टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये सीरिजबाबत (web series) उत्सुकता पाहायला मिळते.


--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज (web series) १२ फेब्रुवारी २०२१ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.