rape casecrime news- बलात्कार प्रकरणी ७ वर्षे शिक्षा भोगून परत आलेल्या एका नराधमाने ५ वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (rape case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. संदीप सुदाम तिरामली (वय ३७, रा. शिरसगाव) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मेहुणवारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी संदीप याने काही वर्षांपूर्वी एका ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्या खटल्यात संदीपला ७ वर्षे शिक्षा झाली होती. दोन महिन्यांपूर्वी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे त्याने एका ५ वर्षाच्या मुलीवर पुन्हा बलात्कार (rape case) केला. घटनेनंतर तो फरार झाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. तो मनमाड येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन मनमाड रेल्वे स्थानकावर पळून जाताना त्याला पकडले. (crime news)

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------