malaika arora



entertainment news-
मलायका अरोराने फोटो शेअर करण्याचा नुसता धडाका लावला. मलायका सध्या  बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर आणि बहिण अमृता अरोरा सोबत गोव्यात सुट्यांचा आनंद घेत आहे आणि यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता मलायकाने एक नवा फोटो शेअर केला आहे या फोटोने इंटरनेटच्या (viral on internet) दुनियेत नुसता धुमाकूळ घातला आहे.

आधी मलायकाने स्वीमसूटमधील फोटो शेअर केलेत. यानंतर बॉयफ्रेन्ड अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला. आता नव्या वर्षाच्या तिसºया दिवशी तिने स्वत:चा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. स्माईल, आनंदी राहा आणि नववर्ष आनंदी करा, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत.

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

अलीकडे मलायकाने अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर मलायकाची बेस्ट फ्रेन्ड करिना कपूरने कमेंट केली आहे. ‘माझे दोन फेवरेट्स, मेन्यू में क्या है आज?’ असे करिनाने लिहिले.



अर्जुन कपूर व मलायका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. अर्जुनसाठी मलायका काहीही करायला तयार आहे. म्हणायला मलायका व अर्जुन गोव्यात आहेत. पण याठिकाणीही अर्जुनसाठी तिने खास त्याच्या आवडीचे जेवण बनवले. अर्जुनने या स्पेशल डिशचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर  (viral on internet)  केला आहे.

अर्जुन कपूर व मलायका दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. आधी दोघांनीही जगापासून लपवून ठेवले, पण आता दोघेही अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करतात. याआधी असाच एक व्हॅकेशनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत अर्जुन व मलायकाने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्याआधी करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.