makar sankrant


Makar Sankranti Messages:मकर संक्रांती हा हिंदूंचा मुख्य उत्सव आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारतात तसेच नेपाळमध्ये साजरा होणार सण आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवशी मकर संक्राती साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. भारतात मकर संक्रातीचा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात हा सण संक्रांती म्हणून साजरा केला जातो.

मकर संक्रांती उत्सवाला काही ठिकाणी उत्तरायणी देखील म्हटले जाते. यंदा मकर संक्राती उत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी हा सण साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना यंदा मकर संक्राती निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा (Makar Sankranti Messages) देऊ शकता. 

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------


मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना मकर संक्रातीच्यां गोड गोड शुभेच्छा! तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….

नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग, आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग…. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !