serum institute


करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे (corona vaccine) सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कोव्हिशिल्ड लसीच्या (corona vaccine) वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.

--------------------------------
Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “इन्सिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही”.

अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का ? याचीही पाहणी करत आहेत. दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीरमची मांजरीत (serum institute) जी नवी इमारत उभारण्यात आली आहे त्याच्या एका बाजूला आग लागली आहे. अग्निशन आणि इतर यंत्रणा तिथे उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरु आहे. लस तयार करणाऱ्या युनिटला कोणताही धोका नाही. आकाशवाणी परिसरातील जुन्या ठिकाणी लसीचं सर्व काम चालतं. जीवितहानी झालेली कोणतीही माहिती नसून लस निर्मितीला कोणताही धोका नाही/ आगीचं कारण अस्पष्ट असून सध्या त्याबद्दल काही सांगू शकत नाही”.