rajesh topeराज्यात एकीकडे करोना लसीकरणाची (vaccine news) तयारी सुरु असतानाच महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. “पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला कमी डोस आले आहेत,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यासोबत केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

करोना लस महाराष्ट्रात आली असून १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. याबद्दल राजेश टोपेंनी बोलताना सांगितलं की, “मला समाधान आहे. आपण आठ लाख लोकांना अपलोड केलं आहे, त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल”.

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

“१६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रात दोन ठिकाणी पंतप्रधानांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय आहे. येथून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“मी दोन दिवसांपूर्वी ते ५११ केंद्रांवर लसीकरणाचं (vaccine news) नियोजन केलं होतं. पण कालच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्र सरकार (central government) आणि आरोग्य मंत्रालयाने इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका असं सांगितलं. इतर जो कार्यक्रम आणि गोष्टी सुरु ठेवणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे ५११ वरुन ही संख्या ३५० केली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.