terrorists attack

crime news- नवीन वर्षाच्या सुरुवातील एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झाकी उर रहमान लखवी (Zaki ur Rehman Lakhvi) याला अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली ( arrested on charges of financing terrorists) त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई हल्ल्याचा (terrorists attack)कट रचणे आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद याच्यासोबत झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता.

मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा कट, आखणी आणि अंमलबजावणीत लखवी यांचा थेट सहभाग होता. 26/11 च्या हल्ल्यापूर्वी लखवीने डेव्हिड हेडलीला पुन्हा काम करण्यासाठी कसे राजी केले, मार्गदर्शन केले याविषयीही तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तौयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर लखवीला संयुक्त राष्ट्र संघाने मुंबई हल्ल्यानंतर जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलं होतं. 

terrorists attack


----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

मुंबई हल्ल्याच्या चौकशीदरम्यान हाफिस सईदला दहशतवादी हल्ल्याची (terrorists attack) संपूर्ण योजना तयार करण्याचे काम लखवीने दिले होते. या हल्ल्यात, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेतील अतिरेक्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 166 लोक ठार झाले, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. अनेक निरपराध लोकांच्या मृत्यूचा कट आखणाऱ्या लखवीला सुमारे सहा वर्षांच्या कोठडीनंतर एप्रिल 2015 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातून सोडण्यात आले होते. (crime news)