बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीतील रिम्स रुग्णालयात (hospital treatment) उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लालूप्रसाद यांना निमोनिया झाला असून त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचले आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सूज आली आहे आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळल्याने माजी मुख्यमंत्री राबडी देवी, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मंत्री तेजप्रताप यादव आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांनी लालूप्रसाद यांची भेट घेतली. चारा घोटाळ्यात आरोपी असलेले लालूप्रसाद यादव सध्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल (hospital treatment) करण्याची तयारी करण्यात येत आहे.
डॉक्टरांच्या (doctors team) पथकाकडून लालूप्रसाद यांच्या प्रकृतीचा अहवाल आल्यावर तुरुंग प्रशासन कनिष्ठ न्यायालयाकडून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी घेणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर शनिवारीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची किडनी 25 टक्केच कार्यरत आहे. तसेच त्यांचे क्रियेटिनही वाढले आहे. त्यातच त्यांना निमोनिया झाल्याने आणि फुफ्फुसांमध्ये पाणी जमल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.
--------------------------------
Must Read
📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही
📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार
🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट
--------------------------------
लालूप्रसाद यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या तपासणीचा अहवाल येण्याची आम्ही वाट बघत आहोत. डॉक्टरांनी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे तेजस्वी यांनी सांगितले. त्यांचा अहवाल आल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही. त्यांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
चारा घोटाळ्यात आरोपी असलेले लालूप्रसाद यादव रांची येथील तुरुंगात (jail) आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लालूप्रसाद यांनी गुरुवारी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर केलेल्या तपासणीत त्यांनी निमोनियाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमल्याने त्यांचा चेहऱ्यावर सूज आली आहे.
रांची तुरुंगाचे आयजी वीरेंद्र भूषण यांनी रिम्स प्रशासनाला लालूप्रसाद यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तातडीने दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. ते डॉक्टर लालूप्रसाद यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत असून त्यांच्यावर उपचार करत आहे. लालूप्रसाद यांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची आणि रिम्समध्ये राहण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.