(Action) थर्टी फर्स्टला शहर परिसरात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 758 जणांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांच्याकडून 43 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल केला. 12 मद्यपी वाहन चालकांवर खटले दाखल केले. थर्टी फस्ट (Third fust) दिवशी शहर परिसरात पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली. वाहतुकीसाठी बंद केलेल्या अगर एकेरी मार्गातून प्रवेश करणे, आसन क्षमतेचा भंग करणे, कर्कश व्हॉर्न, फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंडही वसूल केला. तसेच 12 मद्यपी वाहन चालकांची थेट सीपीआरमध्ये नेऊन वैद्यकीय तपासणी करत त्यांच्यावर खटले दाखल केले. 

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

कारवाईचे स्वरूप कारवाई वसूल दंड 

एकेरी प्रवेश बंद मार्गाचे (Actionउल्लंघन 47 1000 
वाहन चालविताना मोबाईलचा वापर 18 200 
फॅन्सी नंबर प्लेट 104 4800 
कर्कश व्हॉर्न 19 1000 
नो पार्किंग 14 --- 
झेब्रा क्रॉसिंग 23 --- 
सिग्नल तोडणे 1 ---- 
रहदारीस अडथळा 122 21200 
सीट बेल्ट न लावणे 9 600 
इतर 364 12300