kolhapur


kolhapur- अवघ्या आछ वर्षाच्या दूर्वांक गावडे याने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड (International Book of Records) सह तब्बल तीन रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची किमया केली आहे. तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या दूर्वांकने 2 मिनिटे 37 सेकंदांच्या विक्रमी वेळेमध्ये 200 मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा हा अनोखा विक्रम केला (competitive exams) आहे. त्याच्या या अनोख्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड" या तीनही बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. याची दाखल घेत प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमामध्ये दूर्वांक गावडेंचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. 

कोरोना कालावधीमध्ये सर्वच क्षेत्रामध्ये काहीशी निराशाजनक होऊन नाउमेद झालेल्या अवस्थेत होती. या परिस्थितीमधे आपण वेगळं काय करू शकतो या विचाराने दुर्वांकने काहीतरी नवीन सिद्ध आणि साध्य करायचं या हेतूने मानवी रोगजनक विषाणूंचे माहिती संकलन करण्यास सुरवात केली. त्यासाठी त्याने विज्ञानाची पुस्तके, तज्ज्ञ डॉक्‍टर आणि इंटरनेटचा आधार घेतला. या सर्वांच्या मदतीने तब्बल 200 विषाणूंची यादी तयार केली. या विषाणूंची यादी बनवण्यासाठी दोन ते तीन आठवडे कालावधी लागला. 

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------

या नंतर ही अवघड नावे लक्षात ठेवून अवघ्या 2 मिनिटात 37 सेकंदांमध्ये सांगून विश्वविक्रम केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड (International Book of Records)मध्ये झाली आहे. या जागतिक विक्रमासाठी चाटे कोचिंग क्‍लासेसचे शिक्षक चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य केले. 

दूर्वांकने आजपर्यंत विविध स्पर्धा परीक्षा (competitive exams) दिल्या असून शाळेतील राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड , आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड, राष्ट्रीय संगणक ओलंपियाड यासारख्या अवघड परीक्षेमध्ये देखील सुवर्णपदक मिळविले, एन,एस,टी,एस,इ,स्पर्धा परीक्षेत पहिला क्रमांक मिळून आपली छाप पाडली. स्पर्धा आणि परीक्षा याबरोबरच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून स्कॉलरशिपचा मानकरी ठरला आहे. दूर्वांकला शांतिनिकेतन प्रशालेचे अध्यक्ष संजय पाटील, डायरेक्‍टर राजश्री काकडे, अबॅकसचे प्रशिक्षक प्रणाली आमते, धनराज आमते व पालकांचे सहकार्य लाभले.