know-what-is-saral-jeevan-bima-yojana-term-insurance-policy

(life insurance plan) आजच्या या धावपाळीच्या आणि जीवनाची कोणतीही हमी नसलेल्या काळात प्रत्येकाला आपली पॉलिसी (Policy) काढणे गरजेचे आहे. अनेक कंपन्या विविध ऑफर्स देत असून बाजारात विविध पॉलिसी विकल्या जातात. यामध्ये टर्म इन्शुरन्सला (Term Insurence) सर्वात जास्त मागणी असते. अनेकदा कंपनी आपल्या ग्राहकांना याविषयी जास्त माहिती किंवा यामधील काही अटी सांगत नाही. परंतु या नवीन वर्षात ही पॉलिसी विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.

लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) प्रमाणित टर्म इन्शुरन्स विमा योजनांवर नियम जारी केले आहेत. सरल विमा या पॉलिसीवरील अटी आणि शर्ती सोप्या केल्या असून ग्राहकांना समजायला सोप्या जातील; आशा भाषेत यापुढे त्या असणार आहेत. यामुळे विमा कंपनी आणि ग्राहकांमध्ये विश्वास वाढीस लागून ग्राहक स्वतःला सुरक्षित समजतील. 1 जानेवारीपासून प्राधिकरणाने सर्व जीवन विमा पॉलिसी (Saral Jeevan Bima) विक्रेत्यांना ग्राहकांना योजना ऑफर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे या योजनेची संपूर्ण माहिती ग्राहकांना सांगणे कंपनीला बंधनकारक असणार आहे.

सरल जीवन विमा (Saral Jeevan Bima) ही पॉलिसी पूर्णपणे टर्म पॉलिसी (Policy) असून यामधे या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पॉलिसीची पूर्ण रक्कम मिळणार आहे. यामधे 16 ते 65 वर्ष वयाच्या व्यक्तीसाठी ही पॉलिसी लागू असून 70 वर्ष वयानंतर ही पॉलिसी मॅच्युअर होते. यामधे या पॉलिसीची कमीतकमी रक्कम ही 5 लाख ते जास्तीतजास्त 25 लाख रुपये आहे.

ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर पॉलिसीधारकाने याचे काही हफ्ते भरून झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पॉलिसीच्या 10 पट किंवा त्याने भरलेल्या हफ्त्यांच्या 105 टक्के रक्कम त्याच्या कुटुंबियांना भरपाई म्हणून मिळेल. एकाच वेळी सर्व हफ्ता भरला, (life insurance planतर मृत्यूनंतर व्यक्तीच्या कुटुंबियांना एकूण रकमेच्या 125 टक्के परतावा मिळतो. परंतु पॉलिसी खरेदी करताना ग्राहकांनी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

यामध्ये पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कंपनीच्या सॉल्व्हन्सी रेशो आणि क्लेम सेटलमेंट रेशोकडेही लक्ष दिले पाहिजे. प्राप्त झालेल्या एकूण दाव्यांच्या तुलनेत क्लेम सेटलमेंट रेशो केलेल्या दाव्यांची टक्केवारी आणि इन्शुरन्सकर्त्याचे सॉल्व्हन्सी रेशो यामधून स्पष्ट होतो.

सरळ जीवन विमा पॉलिसी (Saral Jeevan Bima) तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी केल्याने तुम्हाला विमा हफ्त्यामध्ये 20 टक्क्यांची सूट देखील मिळते. त्याचबरोबर इतर पॉलिसींची तुलना करून तुम्ही योग्य पॉलिसी देखील खरेदी करू शकता. याची तुम्हाला योग्य पॉलिसी खरेदी करण्यास खूप मदत होते. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अनेक विमा पोलिसींमध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न पाहून तुमची परतावा रक्कम ठरवली जाते. परंतु सरळ विमा पॉलिसींमधे तुमचे वार्षिक उत्पन्न गृहीत न धरता तुम्हाला पॉलिसी खरेदी करता येते. त्यामुळे कोणतीही पॉलिसी घेताना दुसऱ्या पॉलिसीबारोबर तुलना करून तुमच्यासाठी योग्य असलेली पॉलिसी तुम्ही खरेदी करू शकता.